spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राठोड यांची पाठराखण करत दीपक केसरकरांनी दिली प्रतिक्रिया

पुणे : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर विरोधकांनी मंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांवर आक्षेप घेतला. त्यात महिलांना नेत्यांना यात प्रतिनिधीत्व दिले नसल्याने राजकीय वर्तुलात संताप व्यक्त केला जात आहे. त्यात शिंदे गटाचे आमदार व नवनियुक्त मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील कलंकित मंत्री असा आरोप वारंवार केला जात आहे. यावर स्पष्टीकरण देत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले, हा आरोप एक वर्षांपूर्वी यांच्यावर करण्यात आला होता तो आरोप सिद्ध झाला नाही.

पुढे केसरकर यांनी म्हणाले, “संजय राठोड यांच्याविषयी मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही केले गेले. विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळेच ते अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. तर मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीही नाराज नाही. अनेकांची नाराजी होती. ती बाहेर आली. उठाव करायला धैर्य लागते. नाहीतर सर्वच्या सर्वच आले असते. मात्र तसे झाले नाही, असा टोला दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

अगोदर काय म्हणायचे की आमच्यातील 15 ते 20 लोक परत येणार, परंतु प्रत्यक्षात आम्ही जेव्हा परत झालो तेव्हा त्यांच्यात असलेल्यांपैकी एक कमी झाला आणि आम्ही जर एकत्र राहिलो तर आणखी कितीतरी लोक कमी होणार आहेत. मी उद्धवसाहेब यांच्याबाबत मी काहीच बोलत नाही नि काही बोललो तर टायटल होते, मी उद्धवसाहेब यांच्यावर टीका केली. मला ते नको आहे, म्हणून मी त्यांच्याबाबत बोलणे टाळतो, असेही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा : 

मुंबई भाजपाचे अध्यक्षपदी आशिष शेलार, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

Latest Posts

Don't Miss