spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दीपक केसरकारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील तिखट शब्दांमध्ये उत्तर दिलंय. “उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे. सत्ता गेल्याचं त्यांना दुःखं आहे”, असा घणाघात त्यांनी केला. “तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत आहेत. त्यावेळी महाराष्ट्र दुर्बल झाला हे दिसले नाही का?”, असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही. राज्यपाल यांच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राला कळवली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे. सत्ता गेल्याच त्यांना दुःखं आहे. महाराष्ट्राची जनता ठरवेल की ताकद कमी केली की वाढवली. गेल्या सरकारपेक्षा आम्ही राज्याची ताकद वाढवली आहे. एका क्लिकवर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.

“शिवसेना खासदार संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेणं हा निर्णय सरकार घेत नाही. ज्यांच्यापासून त्यांना धोका होता ते आता सगळे त्यांच्याबरोबरच आहेत”, असा दावा त्यांनी केला. “शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना तलवार पेलणार नाही असं म्हणणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल काय बोलायचे? उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे वागावे इतकीच अपेक्षा”, असा टोला त्यांनी लगावला. केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून जोरदार टीका केली. तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महाराष्ट्र दुर्बल झाला हे दिसले नाही का? आमचे सरकार येऊन चार महिने झाले नाही तोवर टीका करायची. तुमचे उद्योग जनतेला माहीत आहे, बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून माणसं आयात करावी लागतात. आपण विक झाले म्हणून दुसऱ्याला विक म्हणता, अनेक पक्षांचे आधार घेत असल्याचे केसरकर म्हणाले.

हे ही वाचा : 

श्रद्धा हत्या प्रकरकणात मोठी बातमी; वेगवेगळ्या हत्यारांनं श्रद्धाच्या…

Exclusive : चमकायला शो सैनिक, केसेसमध्ये अडकायला शिवसैनिक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss