Wednesday, September 25, 2024

Latest Posts

युवसेनेचे प्रमुख आधी कुठे दिसत नव्हते ; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई : मागच्या दिवसांपासून हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह हे धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेसह आमदारांनी बंड केल्या नंतर पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांना शिवसंवाद यात्रेमधून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर टीकेची झोड उठवतान दिसत आहेत. या पार्श्वभूमिवर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद परत एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाबाजी करत निशाणा साधला आहे.

राज्यात सर्कस सुरु झाली आहे. गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले, अशी टीका आदित्य ठाकरेंकडून वारंवार करण्यात येत होती. याच टीकेला उत्तर केसरकरांनी दिले ते म्हणाले, “आज तुम्ही मुंबईत दिसू लागले. युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते. मात्र आता शाखेत फिरु लागलेत, उद्धव ठाकरे जनतेला कितीवेळा भेटले?, मंत्रालयात कितीवेळा गेले?, आघाडी तोडा हे आम्ही सांगत होतो, मग आम्ही कटकारस्थान केले हे का बोलताय?’ असा प्रश्न केसरकरांनी आदित्य ठाकरे यांना केला.

हेही वाचा : 

विदर्भासह मराठवाड्यातील अतिवृष्टी भागात ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांची राज्य सरकारकडे मागणी

Latest Posts

Don't Miss