आदित्य ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकर यांचं प्रतिउत्तर

आदित्य ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकर यांचं प्रतिउत्तर

काही दिवसांपासून महाराष्ट्रमधलं राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. काल शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उत्तर दिलं आहे. दीपक केसरकर म्हणाले, कोस्टल रोडवर (Coastal Road) मार्केट रेटच्या बरोबर रेट आणले. १२ टक्के जास्त झालं. त्यावेळी तुम्हाला हे कळलं नाही. त्याठिकाणी दर्जेदार काम व्हावं म्हणून निर्णय घेतला आहे. सगळ्यात चांगल्या एजंसीला काम दिलं. देशात सर्वोत्कृष्ट काम त्यांनी केलेली आहेत.अशाच लोकांची स्पर्धा होती. बराच वेळ ही स्पर्धा चालली. तेथे कोणीही सहभागी होऊ शकत होतं.

पुढे केसरकर म्हणाले, ही कामं होऊन मुंबई खड्डेमुक्त (Mumbai pothole free) झाली तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. ते झाले तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले सौदर्यीकरण होत आहे. मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचं काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.

वेगवेगळ्या ठिकाणी सोयरिक शोधले जात आहेत. अनेक लोकांशी सोयरिक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते चिंतेत आले असतील. त्यामुळं यांना घाई झाली असेल. निवडणुका लवकर घ्या, असं त्यांना वाटत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) येतात. तेव्हा मुंबईची जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असते. मोठं-मोठे प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा मुंबईकरांचा कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईकर येतील. लोकांना दिलासा देणारा हा कार्यक्रम आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांची उद्धाटनं (Inauguration of major projects), भूमिपूजनं होणार आहेत. अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

हे ही वाचा:

शिवराज राक्षे ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

खेळाडूंना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकर देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version