spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…

महाराष्ट्रात सध्या फूट पाडण्याचे राजकारण सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. यानंतर पक्षाचे विधिमंडळातील कार्यालय शिंदे गटाकडे जाते कि काय असा प्रश्न सर्वांना पडला. या संदर्भात बोलताना शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले (Shiv Sena Minister Deepak Kesarkar) शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत असा आमच्याविरोधात एक गैरसमज पसरवला जात आहे, परंतु असे नाही आहे. आम्हाला यापैकी काहीही नको आहे.

महाराष्ट्रात सध्या फूट पाडण्याचे राजकारण सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. यानंतर पक्षाचे विधिमंडळातील कार्यालय शिंदे गटाकडे जाते कि काय असा प्रश्न सर्वांना पडला. या संदर्भात बोलताना शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले (Shiv Sena Minister Deepak Kesarkar) शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत असा आमच्याविरोधात एक गैरसमज पसरवला जात आहे, परंतु असे नाही आहे. आम्हाला यापैकी काहीही नको आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे देखील मंत्री दीपक केसकर म्हणाले. तसेच पक्षाच्या अधिकार वाणीवर भाष्य करताना शिवसेना मंत्री दीपक केसरकर म्हणाले ‘आम्हाला काही नको आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार आहोत’

उद्धव ठाकरेंनी सेनेतील घटना बदलून अधिकार स्वतःच्या हातात घेतले,आणि शिवसैनिकांचे पैसे स्वतःच्या नावावर केले. हे सर्व शिवसैनिकांसाठी अयोग्य आहे. तसेच उद्धव ठाकरेंना इशारा देत शिवसेना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत. सहानुभूती निर्माण करणे आता बस झाले, आम्ही सहा महिन्यात काय काम केलं ते दाखवतो, तुम्ही अडीच वर्षात काय केले हे दाखवा, असे आव्हानात्मक वक्तव्य दीपक केसरकरांनी केले आहे. याचबरोबर पार्टी फंडातला सर्व पैसा शिवसैनिकांना देऊन टाकावे अशी आम्ही मागणी करतो असे दीपक केसरकर म्हणाले.

पुढे पक्षाप्रती असलेल्या निष्ठे बाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले, ‘शासन म्हणून आमचे आहे ते आम्ही घेणार, आम्हाला दुसरे काही नको. राऊत (sanjay raut) म्हणाले होते कि ते बाळासाहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत’ . परंतू त्यांची पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल एकनिष्ठा नाही. जी जबाबदारी शरद पवार(Sharad Pawar) साहेबांनी त्यांच्यावर दिली होती ती अजून पूर्ण नाही. त्यांनी दोन हजार कोटींचे जे वक्तव्य केले त्याविरोधात कोर्टात गेलं पाहिजे,माझे हे मत मी राष्ट्रीय कार्यकारणी मांडणार आहे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा :

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद

Uddhav Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss