उद्धव ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकारांचं प्रतिआरोप

उद्धव ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकारांचं प्रतिआरोप

ठाकरे गटाच्या वतीने बुलडाणा येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. ज्यांना स्वतःचं भविष्य माहिती नाही, ते आता नवस फेडायला गेले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू नये, असं आवाहन ठाकरेंनी केलं. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी खोक्यांच्या मुद्द्यावरुन शिंदे गटाला पुन्हा डिवचलं. ठाकरेंच्या टीकास्रांना गुवाहटी येथून दीपक केसरकर यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे जास्त बोलत नाही. म्हणून त्यांनी काहीही बोलू नये. आमच्याकडे पण खूप गोष्टी आहेत. खोटं बोलण्याची मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील तोंड उघडू. परंतु, ठाकरे घराण्याविषयी आम्हाला आदर आहे. त्यांची बदनामी व्हावी अशी आमची इच्छा नाही. परंतु, आमची अशीच बदनामी केली तर आम्ही देखील खोके कोठे गेले हे सांगू. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक का लढवली नाही? शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं? ते त्यांनी सांगावं, असं आव्हान देखील यावेळी दीपक केसरकर यांनी यावेळी केलं.

आम्ही २५ जण उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून आपण आपल्या मूळ मित्र पक्षाकडे जावू, असं म्हणालो होतो. परंतु, त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं. परंतु, त्यांनी खोटं बोलण्याची मोहीम राबवली आहे. खोंट बोलण्यासाठी अनेक लोकांची नेमणूक केली. खोके-खोके म्हणून कोणाला हिनवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल आणि कायद्यामध्ये जसा माफीचा साक्षीदार हे कलम आहे. मग कळेल खोके कोणाकडे गेले ते. खोटं बोलण्याची देखील एक मर्यादा असते. त्यांनी ती मर्यादा ओलांडू नये अन्यथा आम्ही देखील तोंड उघडू, असा इशारा दीपक केसरकर यांनी यावेळी दिला आहे.

हे ही वाचा : 

Vikram Gokhale : असा नट पुन्हा होणे नाही

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत,परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, हल्ल्याच्या सूत्रधारांना न्याय देण्यासाठी भारत कटिबद्ध

कार्तिक आर्यनने सांगितले की, फ्रेडीच्या भूमिकेमुळे दैनंदिन जीवनात त्रास सहन करावा लागला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version