‘दोन्ही बाजू गुरु’ दिपाली सय्यद यांची भावनिक पोस्ट चर्चेत

दिपाली सय्यद यांनी देखील सध्याच्या राजकीय भूकंपावर ट्विट केलं आहे. "एकनाथ शिंदे मला शिवसेनेत घेऊन आले.

‘दोन्ही बाजू गुरु’ दिपाली सय्यद यांची भावनिक पोस्ट चर्चेत
अभिनेत्री तसंच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या ट्विटर वर बऱ्याच सक्रिय असतात. त्या अनेक राजकीय विषयांवर ट्विट शेअर करत असतात. सध्या एकनाथ शिंदे यांच्यावरून राज्यात बरीच चर्चा सुरु आहे. अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका देखील केली आहे. या संबंधी दिपाली सय्यद अनेकदा ट्विटवरून ट्विट करतात. त्यांनी एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरेंना राम लक्ष्मणाची उपमा दिली होती. तर आता दिपाली यांनी अजून एक ट्विट शेअर केलं असून ते सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
अनेक मंडळी सध्या महाराष्ट्रातील चालू राजकारणावर आपलं मत मांडताना दिसतात. दिपाली सय्यद यांनी देखील सध्याच्या राजकीय भूकंपावर ट्विट केलं आहे. “एकनाथ शिंदे मला शिवसेनेत घेऊन आले. उद्धव ठाकरेंनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, असं म्हणत विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्वीकार करू,” असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिले.
“गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे. “दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
Exit mobile version