शिंदे साहेब कालही आदरणीय, आजही आणि उद्याही; दिपाली सय्यदची पोस्ट चर्चेत

शिंदे साहेब कालही आदरणीय, आजही आणि उद्याही; दिपाली सय्यदची पोस्ट चर्चेत

शिंदे साहेब कालही आदरणीय, आजही आणि उद्याही; दिपाली सय्यदची पोस्ट चर्चेत

राज्यात शिंदे – फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यावर राज्यपालांच्या आदेशानुसार दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. नव्या सरकार ने बहुमत सिद्ध केले. अशा प्रकारे शिंदे- फडणवीस सरकारने सत्ता स्थापनेवर शिक्का मोर्तब केला. राज्यात नव्याने आलेल्या सरकारने कामकाजाला सुरूवात केलेली आहे. त्याचबरोबर अनेक निर्णय ही घेण्यात आले आहेत. दर एक दिवस सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरूच असतो. दरम्यान शिवसेना नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी भाजपवर निशाणा साधत एक ट्विट केले आहे. दिपाली सय्यद ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भावनिक वक्तव्यं केले आहे. शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्या ही राहतील असे त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे. तसेच भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांच्यावरच नाव घेऊन निशाणा साधला आहे.

दिपाली सय्यद यांचे ट्विट
अभिनेत्री दिपाली सय्यदने आपल्या ट्विट मध्ये म्हटले, मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाळ समजुन किरीट सोमय्या आणि दोन भाजपचे अन्य दोन वाचाळविर आदरणीय उध्दव साहेब व शिवसेनेवर टिका करतील तर त्यांना एवढच सांगणे आहे कि आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढु नका. आदरणीय शिंदे साहेबांनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजपा आमची शत्रु नाही आणि त्यांच्या विरुध्द आम्हाला बोलण्यास आनंदही नाही परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे.

 

एकनाथ शिंदे बंडखोरी नंतर पक्षातून बाजूला झाले तेव्हा ही दीपाली सय्यद यांनी माध्यमांसमोर अशीच भावना बोलून दाखवली होती. तसेच ट्विटर च्या माध्यमातून त्या वेळोवेळी आपले मत मांडत होत्या. या आधीही दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केले होते. आदरणीय उद्धव साहेब जिंकले तर काहीजण बोलतात आदरणीय शिंदेसाहेब जिंकले. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवुन शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे. जय महाराष्ट्र, असं सय्यद म्हणाल्या होत्या.

Exit mobile version