spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Deepali Sayyed : ‘सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत’, अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद यांचा सूचक इशारा

शिवसेना विभागली गेली, शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं.

शिवसेना विभागली गेली, शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं. त्यानंतर त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या ठाकरेगटाच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyad) मागच्या काही दिवसांपासून शांत होत्या. आता त्या शिंदेगटाच्या मार्गावर असल्याची चर्चा होतेय. काही दिवसांआधी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हाही त्यांच्या शिंदेगटातील प्रवेशाबाबत चर्चा झाली होती. तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, राजकीय वर्तुळात अंधारेच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार? अशी चर्चाही रंगली आहे.

शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी अगदी काही महिन्यातच आपली एक वेगळी छाप पाडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या एक रणरागिणी म्हणून समोर आल्या आहेत. मात्र किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, निलम गोऱ्हे यांच्यासोबत आतापर्यंत सेलिब्रेटी रणरागिणी म्हणून शिवसेना ठाकरे गटात वावरणाऱ्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर नेमक्या कुठे आहेत ? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान, दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दब मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद कुठे गायब आहेत. स्क्रिनवर येऊन टीका करणं म्हणजे सक्रिय आहे असं नाही. असं उत्तर सय्यद यांनी या प्रश्नावर दिले आहे.

पुढे दिपाली सय्यद म्हणाल्या, जेव्हा गरज होती तेव्हा मी बोलले. पण आता सतत टीव्ही स्क्रीनवर येऊन तू-तू, मै-मै करणं गरजेचं नाही. मी सध्या लोकांची कामं करतेय. बोलण्याइतकंच काम करणंही गरजेचं आहे. ते मी सध्या करतेय. सुषमा अंधारे आत्ता आत्ता सेनेमध्ये आल्या आहेत. त्यांना प्रुफ करयाचं आहे की, मी सेनेमध्ये आले आहे. सेनेत माझं अस्तित्व आहे. मला सेनेत येऊन साडेतीन वर्ष झाले आहेत. मी काम करत आहे. स्क्रिनवर येऊन टीका करणं म्हणजे सक्रिय आहे असं नाही. मला दोघं एकत्र यावेत असं वाटत होत. या अशा राजकीय परिस्थितीचा कार्यकर्त्यांवर परिणाम होत असतो.

“एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केला होता. मात्र ते आता कधी होईल माहीत नाही. स्क्रीनवर नसले तरी मी राजकारणात सक्रिय आहे. ग्राउंड लेव्हलला माझं काम सुरू आहे.”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत. दसरा मेळाव्याला मी इथे नव्हते कारण मी पुण्यात होते. प्रचंड गर्दी दसरा मेळाव्याला होती. मात्र मला असं वाटलं की, दोन्ही माणसं आपलीच आहेत, असं त्या म्हणाल्या.

प्रत्येकजण आपापलं मत मांडत आहेत. प्रत्येक जण गट करतायत. हा माझा गट आहे हा तुझ गट आहे असं राजकारणात सुरु आहे. असं सांगताना एक दिवस माझाही गट असेल. असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तुम्ही सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहात का असं विचारलं असता त्या म्हणाले शिवसेना कोणाची हे अजून ठरलं नाही. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. भविष्यात तुम्हाला माझी भूमिका कळेलच.

हे ही वाचा:

Jakarta Mosque Fire : इंडोनेशियामध्ये मोठ्या मशिदीला भीषण आग

Diwali 2022 : मुंबईत परवान्याशिवाय फटाकेविक्रीवर बंदी!

… तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली म्हणतं, शिंदेनी नाव न घेता साधला अप्रत्यक्षपणे निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss