spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dipali Sayyad : दीपाली सय्यद आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर; भेटीआधीच शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा

शिवसेनेत दोन गट झाल्याने मागच्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटात आणि शिंदे गटात शिवसैनिकांचे इनकमिंग सुरू आहे. दरम्यान दोन्ही गटातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान ठाकरे गटाला दुपारी पाठींबा देऊन रात्री शिंदे गटात सामिल झाल्याच्या घटना घडल्याने ठाकरे गटाला जोरदार धक्के बसत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्ये केल्याने त्या कोणत्या नवीन गटात सामील होणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : 

Mumbai Local Train : अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाड असल्याने, पश्चिम रेल्वेची विस्कळी

दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट होणार आहे. काही दिवसांपूर्वीही सय्यद शिंदेंना भेटल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी त्यांनी यावरुन काही ठोस उत्तर दिलं नव्हतं. आपण लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करू असं दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार की नाही, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आजच्या भेटीनंतर हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होते. एकत्र आले तर आपलं बळ वाढेल असं मला वाटत होतं. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे. जे कार्यकर्त्यांसोबत काम करतात त्यांनाच हे जाणवतं, असेही त्या म्हणाल्या.

Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या जामिनावर आज निर्णय, ठाकरेंची तोफ तुरुंगाबाहेर येणार का?

“शिवसेनेत काम करताना मला साडेतीन वर्ष झाली”

तुम्ही सध्या शांत का आहात? असं विचारण्यात आलं असता त्यांनी “सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्ष झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात” असं सांगितलं.

मविआ नेते अडणीत येणार?, मानहानीचा खटला दाखल करण्याचा शिंदे गटाचा निर्णय

Latest Posts

Don't Miss