Thursday, July 4, 2024

Latest Posts

Delhi Airport Accident: Prakash Ambedkar यांची BJP, Congress वर जोरदार टीका

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत, "दोषारोपाचा खेळ मृत व्यक्तीला मृत होण्यापासून परत आणू शकतो का?" असा सवाल उपस्थित केला आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) २८ जून रोजी मोठा अपघात झाला. मुसळधार पावसात टर्मिनल १ च्या छताचा काही भाग कोसळला. या अपघातात (Delhi Airport Accident) एकाचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर काँग्रेस (Congress) आणि भाजपकडून (BJP) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत, “दोषारोपाचा खेळ मृत व्यक्तीला मृत होण्यापासून परत आणू शकतो का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली. यात त्याणी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दुर्घटनेवर भाष्य करत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, “काँग्रेस भाजपला दोष देईल. भाजप काँग्रेसला दोष देईल. एक जीव गेला. कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते आणि समर्थक मीडिया आणि सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप करणार आहेत. त्यांचा दोषारोपाचा खेळ मृत व्यक्तीला मृत होण्यापासून परत आणू शकतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, “केंद्र आणि राज्य सरकार काय सुधारणा करत आहेत? केंद्र आणि राज्याने सार्वजनिक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत का? जेणेकरुन दोष ओळखून दुरुस्ती वेळेत करता येईल आणि अशा “मानवनिर्मित” अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही. गहाळ किंवा जीर्ण झालेले छप्पर साहित्य नियमितपणे तपासण्याचे धोरण काय आहे? आणि,अशा अंमलबजावणीची खात्री कोण करतो?” असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? Sharad Pawar यांचं थेट उत्तर

“तिजोरीत खळखळाट, अन् थापांचा सुळसुळाट” असे म्हणत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस दणाणून सोडला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss