spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मला एक दिवसासाठी सीबीआय, ईडी द्या आणि मग बघा…’ केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

दिल्लीत एमसीडी निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे आणि ती सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पार्टी असल्याने भाजपसाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे अशी चर्चा राज्यकीय क्षेत्रात सुरु आहे.

हेही वाचा : 

सरदेशमुखांच्या वाड्यातील रहस्य आता उलगडणार; बहुप्रतिक्षित ‘अथांग’ वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित

दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही एमसीडीला गेल्या ५ वर्षांत १ लाख कोटी रुपये दिले, पण या लोकांनी सर्व पैसे खाऊन टाकले. हे लोक भरपूर पैसे खातात. यांनी थोडंतरी काम केलं असतं, तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता. असा केजरीवाल यांनी म्हटले आहे.

भगव्या पक्षाला महत्त्वाच्या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्याने भाजप दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा खळबळजनक दावा केजरीवाल यांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. भाजपचे खासदार आणि दिल्लीचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी हे उघडपणे आपल्या गुंडांना केजरीवालांवर हल्ला करण्यास सांगत असल्याचा आरोपही दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांनी केला.

Maharashtra Shahir : बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट

“गुजरात आणि एमसीडी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने, भाजप अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट रचत आहे. त्यांचे खासदार मनोज तिवारी उघडपणे त्यांच्या गुंडांना अरविंदजींवर हल्ला करण्यास सांगत आहेत आणि त्यांनी त्यासाठी पूर्ण नियोजन केले आहे.आप त्यांच्या क्षुद्र राजकारणाला घाबरत नाही, आता जनता आहे. त्यांच्या गुंडगिरीला उत्तर देऊ,” असे सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Latest Posts

Don't Miss