Delhi MCD Election Result 2022 दिल्लीत ‘आप’ची आघाडी, भाजपा-आपमध्ये जोरदार चुरस!

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दि. ७ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Delhi MCD Election Result 2022 दिल्लीत ‘आप’ची आघाडी, भाजपा-आपमध्ये जोरदार चुरस!

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दि. ७ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या निकालात आप पक्षाला स्पष्ट बहुमत देण्यात आले होते. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आप भाजपाची ही सत्ता खालसा करणार का? या कडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच आता सध्याची परिस्थिती पाहता आम आदमी पक्षाची बहुमताचा आकडा गाठेल, असे चित्र दिसत आहे.

हे ही वाचा : Delhi MCD Election Result 2022 LIVE : भाजपा-आपमध्ये चुरस! दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचे अपडेट वाचा एका क्लिकवर…

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत हाती आलेले कल पाहता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) स्पष्टपणे आघाडी घेतल्याचे दिसत आहे. सध्या आम आदमी पक्ष १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपचे उमेदवार १०६ जागांवर आघाडीवर आहेत. तब्बल ३९ जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी १७ जागांवर आप, २० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय, काँग्रेस पक्षाचे उमेदवार ११ जागांवर आघाडीवर आहेत. दिल्ली महानगरपालिकेच्या एकूण २५० जागांसाठी मतदान झाले होते. बहुमतासाठी १२६ चे संख्याबळ आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम आदमी पक्षाची बहुमताचा आकडा गाठेल, असे चित्र दिसत आहे.

यापूर्वी बहुतांश एक्झिट पोल्सनी दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज जवळपास खरा ठरताना दिसत आहे. मात्र, केजरीवालांचा आम आदमी पक्ष भाजपला १०० जागांचा टप्पा ओलांडून देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला १४९ ते १७१ जागा मिळू शकतात. तर भाजपची मजल ६९ ते ९१ जागांपर्यंत जाऊ शकते. काँग्रेसला केवळ ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्यांना ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी गेल्यावेळच्या तुलनेत वाढल्याचे दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला जवळपास ४३ टक्के मते पडली आहेत. संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत या आकडेवारीत बदल होऊ शकतो. तर भाजपला आतापर्यंत ३९ टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेस पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत मात्र घट झालेली दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत ९ टक्क्यांची घट होऊन त्यांना आतापर्यंत १२.५ टक्के मतं मिळाली आहेत.

हे ही वाचा : 

RBI Repo Rate Increased आरबीआय कडून रेपो व्याज दरात वाढ

Parliament Winter Session जी-20 च्या माध्यमातून भारताला जगाला सामर्थ्य दाखवण्याची संधी, नरेंद्र मोदी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version