Delhi MCD Election Result 2022 LIVE : भाजपा-आपमध्ये चुरस! दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचे अपडेट वाचा एका क्लिकवर…

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दि. ७ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Delhi MCD Election Result 2022 LIVE : भाजपा-आपमध्ये चुरस! दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचे अपडेट वाचा एका क्लिकवर…

Delhi MCD Polls Counting Result 2022 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दि. ७ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या निकालात आप पक्षाला स्पष्ट बहुमत देण्यात आले होते. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आप भाजपाची ही सत्ता खालसा करणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दिल्ली महापालिका भाजपासाठी राजकीय दृष्टीकोनातून खूप महत्त्वाची आहे. भाजपाची दिल्ली पालिकेवर मागील १५ वर्षांपासून सत्ता आहे. त्यामुळे यावेळीही ही सत्ता कायम राखण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. तर आप पक्षाने आपले शिक्षण धोरण, मोफत वीज, आरोग्य सुविधा या मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच दिल्ली पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार आहेत.

निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

आपचे ५९ उमेदवार आघाडीवर
काँग्रेसचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर

आम आदमी पार्टीला बहुमत मिळण्यासाठी काही जागांची आवश्यकता आहे
सध्या भाजपा ११५ , आम आदमी पार्टी १२३ आणि काँग्रेस ७ जागांवर पुढे आहे

कादापूर वॉर्ड क्रमांक ७ मध्ये आपच्या मुनेश शर्मा यांचा विजय
भाजप उमेदवार उर्मिला राणा यांच्यावर १२०० मतांनी आघाडी

४९जागांवर आपचा विजय
४० जागांवर भाजपा जिंकली
४ जागा काँग्रेसच्या खात्यात
१ जागेवर इतर अपक्ष विजयी

आतापर्यंत १४५ जागांचे निकाल जाहीर
त्यापैकी ८० जागांवर आप तर ६० जागांवर भाजपाचा विजय
काँग्रेसच्या खात्यात ४ जागा तर अपक्षांना १ जागा

हे ही वाचा : 

RBI Repo Rate Increased आरबीआय कडून रेपो व्याज दरात वाढ

Parliament Winter Session जी-20 च्या माध्यमातून भारताला जगाला सामर्थ्य दाखवण्याची संधी, नरेंद्र मोदी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version