Delhi MCD Election Result 2022 दिल्लीच्या राजकारणात झाला मोठा बदल ! ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराने केला काँग्रेस उमेदवाराचा पराभव

दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे.

Delhi MCD Election Result 2022  दिल्लीच्या राजकारणात झाला मोठा बदल ! ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराने केला काँग्रेस उमेदवाराचा पराभव

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दि. ७ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या निकालात आप पक्षाला स्पष्ट बहुमत देण्यात आले होते. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. परंतु आता दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ची जादू चालल्याचे दिसून येत आहे. दिल्लीच्या राजकारणात नवी पहाट पाहायला मिळत आहे. AAPचे बॉबी किन्नर (Bobby Kinnar) विजयी झाले असून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एकता जाटव यांचा पराभव केला आहे.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आम आदमी पार्टी (Aap) आणि भाजप (BJP) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या निवडणुकीच्या राजकारणात एक नवी सुरुवात झाली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या ट्रान्सजेंडर उमेदवार बॉबी किन्नर सुलतानपुरी ए वॉर्ड-४३ मधून विजयी झाल्या आहेत. MCD मध्ये पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर समुदायाचा सदस्य एखाद्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे. बहुधा पहिल्यांदाच एखाद्या प्रमुख राजकीय पक्षाने ट्रान्सजेंडर उमेदवार दिला आणि विजयी झाला आहे. बॉबी नावाच्या ३८ वर्षीय ट्रान्सजेंडरला आम आदमी पार्टीने सुलतानपुरी माजरा विधानसभा मतदारसंघातून सुलतानपुरी-ए प्रभागाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. आता जनतेनेही त्यांच्या बाजुने कौल दिला आहे. अण्णांच्या आंदोलनापासूनच बॉबी किन्नर आप नेत्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं. बॉबी ह्या समाजसेवेचं देखील काम करत असतात.

राज्य निवडणूक आयोगानं बॉबी किन्नर यांच्या विजयाला दुजोरा दिला आहे. बॉबी किन्नर यांनी काँग्रेस उमेदवार वरुण ढाका यांचा ६,७१४ मतांनी पराभव केला. यापूर्वी बॉबी म्हणाल्या होत्या, ‘दिल्ली महानगरपालिकेतून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मी काम करणार आहे. याशिवाय, माझा प्रभाग स्वच्छ, सुंदर कसा करता येईल यावर मी भर देणार आहे.’

बॉबी परिसरात समाजसेवेचे कार्य करत आहेत आणि उपेक्षित समाजातील तसेच समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या अडचणीत मदत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी स्वखर्चाने १५ मुलींची लग्ने करुन दिली आहेत. बॉबी हा हिंदू युवा समाज एकता अवाम दहशतवाद विरोधी समितीच्या दिल्ली युनिटचा अध्यक्ष आहे. गेली १५ वर्षे या संस्थेच्या माध्यमातून ते गरजू लोकांना मदत करत आहेत. बॉबी यांचे 9वी पर्यंत शिक्षण झाले आहे. कदाचित समाजसेवा करत असताना एक दिवस दिल्लीची सत्ताधारी आम आदमी पार्टी आपल्याला निवडणुकीचे तिकीट देईल, असे त्यांना वाटले नव्हते. असे ते आवर्जुन सांगतात.

हे ही वाचा : 

Delhi MCD Election Result 2022 दिल्लीत ‘आप’ची आघाडी, भाजपा-आपमध्ये जोरदार चुरस!

Delhi MCD Election Result 2022 LIVE : भाजपा-आपमध्ये चुरस! दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचे अपडेट वाचा एका क्लिकवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version