spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत ‘आप’ला बहुमत, १५ वर्षांपासूनची भाजपची सत्ता येणार का संपुष्टात ?

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिकेत अखेर आपने बाजी मारली आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दि. ७ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिकेत अखेर आपने बाजी मारली आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज दि. ७ डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या निकालात आप पक्षाला स्पष्ट बहुमत देण्यात आले होते. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आप भाजपाची ही सत्ता खालसा करणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) कमाल केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत (Delhi MCD Election Results 2022) आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची (BJP) दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे.

दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (७ डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी १३६३८ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत सुमारे ५० टक्के मतदान झालं होतं. यामध्ये सर्वाधिक मतदान ६५.७२ टक्के प्रभाग क्रमांक ५ बख्तावरपूर इथे तर सर्वात कमी ३३.७४ टक्के मतदान प्रभाग क्रमांक १४५ अँड्र्यूज गंज इथे झालं होतं. २०१७ च्या दिल्ली महापालिका निवडणुकी भाजपने २७० पैकी १८१ प्रभाग जिंकले होते. या निवडणुकीत आपने ४८ तर काँग्रेसला २७ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकी ५३ टक्के मतदान झालं होतं.

दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या २५० पैकी २३३ जागांचे निकाल (दुपारी २ वाजेपर्यंत) हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला १२६ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप ९७ जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने ७ जागांवर विजय संपादन केला आहे. तर ३ अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही १७ जागांचे निकाल येणं बाकी आहे.

कलांमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन सुरु आहे. तर मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

हे ही वाचा : 

Delhi MCD Election Result 2022 दिल्लीच्या राजकारणात झाला मोठा बदल ! ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराने केला काँग्रेस उमेदवाराचा पराभव

Delhi MCD Election Result 2022 LIVE : भाजपा-आपमध्ये चुरस! दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचे अपडेट वाचा एका क्लिकवर…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss