Nana Patole : दिवाळीनंतर राज्य सरकार बरखास्त करण्याच्या मागणीचा प्रस्ताव, राज्यपालांकडे जाणार?

Nana Patole : दिवाळीनंतर राज्य सरकार बरखास्त करण्याच्या मागणीचा प्रस्ताव, राज्यपालांकडे जाणार?

दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी असल्याचे सामोर येत आहे. राज्यातील ईडी सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी पाटोले यांनी म्हटलंय. आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ईडीच्या भाजपच्या सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

‘मातोश्री’चा किल्ला भक्कम ; दिवाळीनिमित्त मातोश्री निवासस्थानी आदित्य ठाकरे किल्ला उभारण्यात रमले

राज्य सरकारने मंत्रालयात बसून पंचनामे करण्याचे आदेश दिले. पण स्थानिक पातळीवर प्रशासन कामच करत नसल्याचे चित्र आहे,’’ असा दावा पटोले यांनी केला. राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्ती ओढवताच तत्काळ दहा हजार रुपयांची रोख मदत दिली आणि नंतर दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. होते. अटी, शर्ती, नियमांचे अडथळे निर्माण करून शेतकऱ्याला ऑनलाइनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पण भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जातो, अशी टीका त्यांनी केली.

Kishori Pednekar : १२ आमदारांच्या यादीत तेरावा नंबर कुणाचा?, कदमांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे जशास तसे उत्तर

एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब : नाना पटोले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच भारताने जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना आम्हीसुद्धा साडे तीन महिन्यांपूर्वी एक मॅच जिंकलो आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब असेल आणि सत्तेची गर्मी असेल तर यावर टीका प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असं पटोले म्हणाले. सरकारने जनेतेच्या हितासाठी काम करावं. मात्र सध्या महाराष्ट्रातील सरकारने विकास कामं थांबवली आहेत. सरकार हेकेखोरपणाने वागत आहे. त्यामुळे आता जनताच ठरवेल कोण पाकिस्तान आणि कोण भारत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

सूर्यग्रहणानंतर भाऊबीजेचा शुभ संयोग: जाणून घ्या भाऊबीजेचा पूजा करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त

Exit mobile version