spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी ,छगन भुजबळ

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेतेपद जर मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी किंवा लहान समाजाकडे हवे असं छगन भुजबळ म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) काही दिवसांमध्ये संघटनात्मक बदल पाहायला मिळाले. दोन कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यातच आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेतेपद जर मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी किंवा लहान समाजाकडे हवे असं छगन भुजबळ म्हणाले.

आमचा पक्ष लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना वेगळ पद किंवा काम करायचं आहे पण ते पक्षातच काम करणार म्हणतात. माझं मत सुद्धा मी मांडतो. मला फक्त चार महिने अध्यक्षपद मिळालं. भाजपने बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला अध्यक्ष केलं. काँग्रेसने सुद्धा दिलं. आमच्या पक्षातसुद्धा ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड आहेत, मला दिलं तर मी सुद्धा काम करेन. छोट्या समाजाला अध्यक्षपद दिलं पाहिजे असं मला वाटतं,” असं छगन भुजबळ म्हणाले. बीआरएसने मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात केली आहे. सगळीकडे ते पोहोचत आहेत. महाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये फूट पडू नये, यासाठी सावध राहणं गरजेचं आहे. ते आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं स्वतः पवारसाहेब म्हणाले. त्यामुळे मविआच्या मतदारांमध्ये फूट पडू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी बीआरएसच्या महाराष्ट्रातील प्रवेशावर दिली.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “अजित पवार यांना विचारा. ते तर म्हणत आहेत की मला काहीही पद द्या, संघटनेमध्ये काम करणार म्हणता आहेत. प्रदेशाध्यक्ष करायचा निर्णय शरद पवार घेतील. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि मी स्वतः ओबीसी नेता आहे. आता प्रदेशाध्यक्षपदाचा विचार करावा.” “ओबीसी नेता प्रदेशाध्यक्ष करावा, याबाबत अद्याप शरद पवार यांच्याशी बोलणं झालं नाही. माझं मत मी आता मांडत आहे. अजित पवार यांच म्हणणं शरद पवार ऐकत होते. ते ठरवतील यावर निर्णय घेतील,” असंही छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने केली कारवाई

पुण्यात गुंडांची दादागिरी वाढली! भररस्त्यात गाडी आडवी लावून कापला केक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss