मढ, मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु

मुंबईतील (Mumbai) मालाडजवळच्या मढ, मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली.

मढ, मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु

मुंबईतील (Mumbai) मालाडजवळच्या मढ, मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे आणि त्या ट्विट मध्ये ते म्हणाले आहेत, “आज सकाळी मिलेनियर सिटी स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झालं आहे. आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या कृपेने १००० कोटी रुपयांचे मढ, मार्वेमध्ये ४९ अनधिकृत स्टुडिओ बांधले आहेत. भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे सर्व स्टुडिओ आम्ही तोडून टाकू”.

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या पी उत्तर विभागाने या स्टुडिओवर कारवाई केली. संबंधित स्टुडिओ सीआरझेड तीनमध्ये येत असल्याने कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेने संबंधित स्टुडिओला तात्पुरते बांधकाम करण्याची परवानगी २०२१ मध्ये दिली होती आणि त्याची मुदत मे २०२२ मध्ये संपली होती. तसंच या बांधकामासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट एथोरिटीची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्यावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

हे ही वाचा:

गुजरातच्या आकाराचे डूम्सडे ग्लेशियर आहे आपत्तीच्या काठावर, तज्ज्ञांनी दिला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version