spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वंचितचे हाजी अस्लम सय्यद यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला आणि शिवसेना (Shiv Sena) दोन गटांमध्ये विभागली गेल्याच चित्र सध्या दिसत आहे. ठाकरे गटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बंड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणत इनकमिंग सुरु असल्याचं दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) २०१९ मधील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद अलीयांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत अस्लम यांनी मंगळवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविताना त्यांनी जोरदार टक्कर देत सव्वा लाखांवर मते मिळवली होती. त्यानंतर हाजी अस्लम चर्चेत आले होते.

हाजी अस्लम यांना २०१९ मध्ये मिळालेली मते राजकीय भूवया उंचावणारी होती. वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच रिंगणात असताना त्यांना मिळालेल्या मतांनी सर्वाधिक फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना बसला होता. खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात अस्लम सय्यद यांना मिळालेल्या मतांचाही मोठा वाटा होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातही फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर सुद्धा शिंदे गटात आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून (BJP in Kolhapur) विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भाजपच्या आतापर्यंत दोन केंद्रीय मंत्र्यांचा दौरा पार पडला आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या मंडलिक माने यांना भाजप चिन्हावर लढण्यास सांगतिलं जाणार की भाजपचा स्वतंत्र उमेदवार असेल याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

हे ही वाचा : 

MCD निवडणुकीच्या विजयानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींचा घेतला आशीर्वाद, अन् म्हणाले

राज ठाकरेंनी दिला कर्नाटक सरकारला इशारा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss