आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले, उपमुख्यमंत्री अजित पवार

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला आहे.

आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले, उपमुख्यमंत्री अजित पवार

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मागील वर्षाच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पहिले पाणी पिण्यासाठी, दुसरे शेतीसाठी आणि तिसरे पाणी उद्योगासाठी. आधी दुसऱ्यांदा उद्योगाला पाणी देण्याचा निर्णय होता. तो आम्ही बदलला आणि शेतीला प्राधान्य दिले, असे अजित पवार म्हणाले.आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. मी जेवढं काम करतो आहे तेवढं दुसरे कुणी मायका लाल करू शकत नाही. आपले चॅलेंज आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

दिलेल्या संधीचे सोनं करा. लग्न पत्रिकेत फक्त प्रेषक म्हणून पदाचे नाव टाकायला उपयोग करू नका, असा सल्ला पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मलाही साखर कारखान्याचे काहीही कळत नव्हते. पण अभ्यास केला आणि समजून घेतलं, तुम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत काम करा. मी पावणेसहाला बाहेर पडलो तेव्हा गेटवर एकाने पत्र दिले दादा, त्यावेळी अनेक आमदार झोपले असतील. काय काय जण तीनवेळा कागद देतात. आपण बदल्या करण्यासाठी मंत्री झालो नाही. हा बदल्यांचा काळ नाही. मार्च एप्रिल महिन्यात बदल्या होतात. आता जर बदलीसाठी अर्ज केला तर ती फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जाते, असे अजित पवार म्हणाले. मंत्री आदिती तटकरे यांनी चौथे धोरण आणले ते आम्ही मान्य केले. फार बारकाईने हे महिला धोरण राबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आधी पुढे मुलाचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव असे लागायचे. आता मुलाचे, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे लावावे लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महिला हा देखील समाजाचा महत्वाच घटक आहे. महिलांच्या नावावर घर घेतले १ टक्के व्याज कमी लागते, असे अजित पवार म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत झाला त्याचा कौल कसा लागला हे आपण पाहिले आहे. यामध्ये भाजप पहिल्या, राष्ट्रवादी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पक्ष राहिला आहे. बाकीचे पक्ष त्याच्या मागे राहिले आहेत. दरम्यान, आमची सगळ्यांना मदत राहील, असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

चुनाभट्टीतील स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवर दिवसाढवळ्या गोळीबार

बीडच्या सभेनंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version