Maharashtra Assembly Session मुंबईला केंद्रशासित करण्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस भडकले म्हणाले, मुंबई कोणाच्या बापाची…

Maharashtra Assembly Session मुंबईला केंद्रशासित करण्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस भडकले म्हणाले, मुंबई कोणाच्या बापाची…

कर्नाटक सरकारच्या मराठीविरोधी भूमिकेचा तीव्र निषेध करीत बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील इंचन्इंच जमीन महाराष्ट्राचीच असल्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर कर्नाटकच्या कायदामंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी तेथील विधानपरिषदेत केली आहे. या मागणी वर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी कर्नाट मंत्र्यांचा चांगला समाचार घेतला.

हेही वाचा : 

विधानसभेत लक्षवेधीद्वारे अजित पवारांनी केली मागणी, शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक थांबवा

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांनी नव्याने दावे केले जाणार नाहीत हे मान्य केलं होतं. आपणही काल ठराव करताना सर्वोच्च न्यायालयात जो दावा आहे, त्यानुसारच ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा आमदार तसंच काँग्रेस अध्यक्षांनी केलेले दावे त्या बैठकीशी विसंगत आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबई (Mumbai) ही महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जर कोणी दावा सांगत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन वारंवार कर्नाटक सरकारकडू होत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करत असून आम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहित याचा निषेध व्यक्त करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे ती कोणाच्या बापाची नाही. असेही फडणवीस यांनी म्हटले.

Raj Thackeray “साहेब तुम्ही बसा…” वसंत मोरेंच्या ‘त्या’ किस्स्याची पुण्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा

कर्नाटकचे मंत्री नेमकं काय म्हणाले होते?

महाराष्ट्राच्या विधिमंडळात (Legislature of Maharashtra) सीमाप्रश्नाचा ठराव झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावात सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळात उमटले. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण (C. N. Ashwath Narayan) यांनी केली. शिवाय मुंबईत वीस टक्के कन्नडिग असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. बेळगाव केंद्रशासित करायची असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते, असं नारायण म्हणाले.

अजित पवार आज नागपुरातून तातडीने सरकारी विमानाने मुंबईकडे होणार रवाना

Exit mobile version