सर्व माहिती असूनही डायलॉग बाजी का ? अजित पवारांना फडणवीसांचा प्रश्न

राज्याच्या सत्ता संघरचाच तिढा हा सर्वोच न्यायालयाच्या बदलत्या तारखांमुळे अधिक लांबण्याची चिन्हे हि मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

सर्व माहिती असूनही डायलॉग बाजी का ? अजित पवारांना फडणवीसांचा प्रश्न

मुंबई :- राज्याच्या सत्ता संघरचाच तिढा हा सर्वोच न्यायालयाच्या बदलत्या तारखांमुळे अधिक लांबण्याची चिन्हे हि मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ८ ऑगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली होती परंतु ती आता आता पुढे करून १२ ऑगस्ट अशी करण्यात आली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताने सांगितले कि, मुख्यमंतयांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल किंबहुना तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही आधी होईल. तसेच सर्वोच न्यायालयाने मंत्रिमंडळ करू नये असे अजिबात म्हंटले नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल असे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कोण काय म्हणतंय या गोष्टींना सहसा राजकारणात महत्व नसते, परिस्थी काय आहे याला जास्त महत्व असते. त्यामुळे हा काय बोला तो काय बोला यावर उत्तर देण्याइतका मी रिकामा नाही असे देखील फडणवीस म्हणाले. तसेच सर्व माहिती असूनही डायलॉग बाजी का ? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार याना केला आहे. गेल्या सरकारमध्येही देखील सचिवांना काही अधिकार दिले होते. तसेच आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना काही अधिकार दिले होते असे फडणवीस म्हणाले. ही महाराष्ट्रात नाही तर देशात परंपरा असल्याचं त्यांनी सांगितले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं त्यांना आता बोलावेच लागेल. असा टोला फडणवीसांनी अजित पवारांना लगावला.

भारतीय जनता पक्षाने गेल्या ६ महिन्यापासून १६ मतदार संघामध्ये विशेष लक्ष दिले आहे आणि त्यात श्रीकांत शिंदे त्यांचा देखील मतदार संघ होता. पुढील लोकसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजप असं युतीमध्ये लढवली जाणार आहे त्यामुळे जे आमच्या सोबत आहेत त्या शिवसैनिकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट मतं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या १६ मतदार संघामध्ये बारामती मतदार संघ देखील आहे आणि गेल्या दोन्ही निवणुकांत भारतीय जनता पक्षाला चांगली मत मिळाली आहेत त्यामुळे तो मतदार संघ देखील या १६ मतदार संघात आहे. तसेच केंद्रीय भाजपमधील काही ठराविक प्रमुख नेते हे या १६ मतदार संघाना देण्यात आले आहेत. आणि निर्मला सीतारामन याना बारामती मतदार संघ देण्यात आला आहे असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुढे ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षण तर मिळाले आहे परंतु जी ऑर्डर आली आहे त्यात एक गोंधळ झालं आहे कि ज्याचे नोटीफिकेशन निघाले नाही अश्या सर्वाना ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे म्हणून त्या संदर्भात आम्ही कोर्टात पुन्हा जाणार आहोत. आणि निवडणूक कधी घायचा हे निवडणूक आयोग ठरवेल.
ज्यावेळी तुम्ही सत्तेत असता त्यावेळी तुम्ही मराठवाडा, कोकण, विदर्भासाठी काय केलं याच्या आधारवर जनता मूल्यमापन करत असते. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावं आम्ही आमच्या पक्षाचं काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या युतीला राज्यातील जनतेनं कौल दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा :-

शिंदे गटाला आयोगाकडे जाण्याचा हक्क नाही – ठाकरेंची भूमिका

Exit mobile version