अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिंदे आणि भाजप मध्ये रस्सीखेच

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिंदे आणि भाजप मध्ये रस्सीखेच

अंधेरी पूर्व मध्ये २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचा विजय झाला होता. पण काही दिवसांनी त्यांचा दुबई मध्ये मृत्यू झाला. २०१९ मध्ये शिवसेना एकत्रित निवडणूक लढली होती, पण आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने अंधेरीची पोटनिवडणूक बहू चर्चेचा विषय बनली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवणुकीसाठी शिंदे गट आपला उमेदवार देऊन लढणार होते. पण सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळत आहे कि अंधेरी पूर्व विधानसभेत भाजपा आपला उमेदवार देणार आहे.

शिवसेना फुटी नंतर पाहिलांदाच शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने येणार होते. पण आता अंधेरी पूर्व विधानसभा मध्ये भाजप आपला उमेदवार देणार आहे. भाजपने मुरजी पटेल यांना या मतदारसंघांमधून उमेदवारी दिल्याचं सूत्रांच्या दिलेल्या माहितीवरून समजत आहे. मुरजी पटेल हे भाजपा चे माजी नगरसेवक आहेत. २०१९ च्या निवडणुकी मध्ये शिवसेना आणि भाजपा दोनी पक्षांची युती असल्याने ती जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. पण भाजपचे मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्या विरोधात २०१९ साली अंधेरी पूर्व मधून निवडणूक लढली. आणि त्यात रमेश लटके यांचा विजय झाला होता. आता येणाऱ्या पोटनिवणुकीत भाजपा आपली उमेदवारी हि मुरजी पटेल यांना देण्यात येणार आहे असे समजत आहे. त्याच दरम्यान शिवसेनेतून उमेदवारी हि रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना देण्यात येणार आहे. आता हि जागा भाजपाने घेतल्या नंतर शिवसेना आणि भाजपा अशी लढत अंधेरी पूर्व विधानसभे मध्ये दिसणार आहे.

सामान्यांना दिलासा, देशात खाद्यतेलाच्या किंमती मोठी घसरण

रमेश लटके यांचा मृत्यू कसा झाला?
रमेश लटके हे अंधेरी पूर्व मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार होते. रमेश लटके आपल्या कुटुंबा साबोत दुबईमध्ये फिरायला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. ५२ व्या वर्षी त्यांनी दुबई मध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. ५२ वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक कट्टर शिवसैनिक आणि विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती.

हे ही वाचा:

मुंबई, पुणे ठाण्यासह सर्वच ठिकाणी मनसेचा ‘एकला चलो चा नारा’

गोव्यात काँग्रेसच्या मनात धडकी, काँग्रेसचे ८ आमदार भाजपचा हात धरण्याची शक्यता

Hindi Diwas 2022 : १४ सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिवस?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version