राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर

विजया नंतर उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र मला लिहिले.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
एकनाथ शिंदे यांच्या सोबत ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला दिवसागणिक वेगळे वळण लागत होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी फडणवीस सरकार सोबत नवे सरकार स्थापन केले. आज विधिमंडळात शिंदे – भाजप सरकारची बहूमत चाचणी पार पडली. एकूण १६४ हा बहुमताचा आकडा मिळवत नव्या सरकार ने महाराष्ट्र राज्यात नवीन सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीच्या पारड्यात ९९ मतं पडून या ठिकाणी त्यांचा पराभव झाला.
विजया नंतर उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र मला लिहिले. मी या पत्राचे उत्तर लगेचच देणार होतो. परंतू त्यांच्यासारखे शब्द मला त्यावेळी सुचले नाहीत. पण मी फोनवरून त्यांचे आभार मानले. त्यांच्या तब्येती बद्दल विचारपूस केली. लवकरच मी त्यांची भेट घेणार आहे. असं ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, एक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. येत्या काळात ते जनसामान्यांमध्ये जाऊन कामे करतील. मुंबई पुरता मर्यादित न राहता ते राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचून एका फोनवर जनतेची कामे करतील, असे म्हणत कौतुक आणि विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Exit mobile version