spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा, फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित…

काल दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यात पुन्हा एकदा वाद झाला आहे. ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.

काल दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यात पुन्हा एकदा वाद झाला आहे. ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची प्रकृती आता स्थित आहे. रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंबीय भेट घेतली आणि या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं असं सुनावलं आहे

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना प्रतिउत्तर दिल आहे. फडणवीस म्हणाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले आहे. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायाला लावू नका.. हा त्यांचा थैयथैयाट आहे याला उत्तर देण्याचे कारण नाही. अडीच वर्षानतंर त्यांचा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतुस कोण आहे हे जनतेला माहित आहे. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार शरसंधान साधलं. पाच वर्षे राज्याचा गृहमंत्री आहे. अनेकांना अडचणी होत आहे. मी गृहमंत्री पद सोडण्याची वाट बघत आहे. मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणार आहे. विरोधक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावं राजा योग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss