spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विरोधकांनी प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर देवेन्द्र फडणवीसांचं प्रतिउत्तर

सध्या विरोधकांनी तपासयंत्रणाच्या गैरवापराचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. विरोधकांच्या मते २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यापासून ईडी आणि सिबीआय चा गैर वापर होत आहे.

सध्या विरोधकांनी तपासयंत्रणाच्या गैरवापराचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. विरोधकांच्या मते २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यापासून ईडी आणि सिबीआय चा गैर वापर होत आहे. विरोधकानानी ह्याबद्दल एक पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांना लिहिलेल आहे त्यात ९ महत्वाच्या विरोधकांचा समावेश आहे. ह्याच पात्राला देवेंद्र फडणवीस ह्यांनी उत्तर दिला आहे . विरोधक म्हणाले, भाजप विरोधी पक्षतील नेत्यांवर आरोप लावून सीबीआय किंवा आदींची चौकशी लावतात आणि नंतर त्याच नेत्यानी भाजप मध्ये प्रवेश घेतला कि त्यांना क्लीन चिट मिळते किंवा त्यांची चौकशी संथ गतीने चालते.

 

विरोधकांच्या ह्या सर्व आरोपांना कोंडून काढत देवेंद्र फडणवीस ह्यांनी आपले स्पष्टीकरण दिले ते आज माध्यमांशी बोलत होते तेव्हा तेम्हणाले कि विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोटे असून त्यावर फार स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. ज्या लोकांनी पैस्याचं गैर वापर केला आहे त्यांना योग्यता शिक्षा मिळणारच आहे. चौकशी हि तपासयंत्रांच्या हातात आहे त्यात राजकीय हस्तक्षेप केला जात नाही, जर कोणी घोटाळा केला असेल तरच त्यांची चौकशी होते आणि भाजप मध्ये आल्यानंतर देखील ती चालू आहे कोणाचीही थांबलेली नाही. त्यामुळे विरोधकांचे सर्व आरोप बिन बुडाचे आहेत.
जर कोणाला चौकशी नको असेल तर त्यावर एकाच उपाय आहे कि भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने पैसे कमावणे बंद केले पाहिजे. आणि तरीही जर विरोधकांना वाटत असेल कि चौकशी चुकीची झाली तर त्यांनी उदाहरण द्यावे. न्यायालयात न्याय मागावा न्यायालय सर्वांसाठी खुले व सामान आहे.

हे ही वाचा :

Sandeep Deshpande घेणार आज पत्रकार परिषद, हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग तर २ जण ताब्यात

मराठवाड्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss