spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल, विमानतळावर केलं जंगी स्वागत

उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपूरात दाखल झाले आहेत.

नागपुर : महाराष्ट्रात भाजप- शिदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपूरात दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित असून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

नागपूर शहरातील विविध भागात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून रॅली ते धरमपेठे येथील फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली आहे.

हेही वाचा : 

मुंबई – गोवा महामार्गावर परशूराम घाटात दरड कोसळी वाहतुकीसाठी घाट बंद

फडणवीसांच्या स्वगताला शेकडो कार्यकर्ते उपस्थित असून त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांनी घोषणा देत शक्तीप्रर्दशन केले. विविध ठिकाणी फडणवीस यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज देखील लावण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील घरी जल्लोषात स्वागत

Latest Posts

Don't Miss