spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे अशा ..” Devendra Fadnavis यांनी दिले कार्यकर्त्यांना आश्वासन

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असताना सुद्धा प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. त्याच प्रमाणे यंदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप सुद्धा आपले हात पाय मारत आहे. यासंदर्भात अमरावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकांना संबोधित केले आहे. त्यात त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. सोबतच अमरावतीच्या काही मूलभूत प्रश्नांवर त्यांनी यात भाष्य केले आहे. या बद्धल आपण सविस्तर जाणून घेऊयात.

नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ? 

 “मला विश्वास आहे की, आपण पूर्ण ताकतीने मैदानात उतरल्यास यश आपल्यापासून दूर नाही. मग तो अमरावती जिल्हा असो की, वर्धा असो किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र. राज्यातील सर्व जागा महायुती जिंकू शकते, अशा प्रकारची हवा राज्यात आहे. केवळ तुमच्या मनाचा निर्धार आणि जिंकण्याची उर्मी तुमच्यात पाहिजे”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते अमरावतीत बोलत होते. “विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात. मात्र, सत्ता गेली की यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो. तुम्ही गेली ६०-७० वर्ष तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली, यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी का आठवला नाही? तुम्हाला शेतमजूर, गरीब का आठवला नाही? तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवले नाहीत? सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दलही भाष्य केले. “त्यावेळी खूप मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अमरावतीत नवनीत ताई, तुम्ही पडल्याचं दु:ख सर्वांना झालं. पण काही लोकांना फार आनंद झाला. राजकमल चौकात त्या सर्वांनी काय केलं, हे आपण सर्वांनी पाहिलं. अरे वेड्यांनो आता जागे झाला नाहीत ना, तर तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं. हे जर सहन करत राहिलात तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणं मुश्किल होईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आपण जर मैदानात उतरलो तर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काहीजण सत्तेत आले की पैसे कमावतात आणि सत्ता गेली की, यांना गरीब आठवतात. सत्ता गेली की यांचे पोपट बोलायला लागतात. यांना सत्ता फक्त पैशासाठी पाहिजे, आता फक्त मैदानात उतरा”, असे आवाहनही देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले.“ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे आणि पुन्हा एकदा आपण पूर्ण ताकतीने जर का मैदानात उतरलो, तसेच तुमच्या सारखे मावळे जर आमच्या सोबत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमचं सरकार मी आणून दाखवेलच”, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी दिले.

हे ही वाचा:

बिनधास्त; तरीही संवेदनशील, बेफिकीर; तरीही हळव्या, खोडकर; तरीही तरल अशा Kishore Kumar यांना वाढदिवसानिमित्त आदरांजली

BAMS शिक्षणासाठी आता मिळणार राज्यातून प्रवेश; मुख्यमंत्र्यानी केली ‘ही’ नवी घोषणा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss