देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सद्याच्या राजकारणात तिन्ही पक्षाकडून काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आशीष देशमुख यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सद्याच्या राजकारणात तिन्ही पक्षाकडून काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आशीष देशमुख यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. “शिवसेना आपल्याकडं आहे. त्यांच्याकडं शिल्लक सेना आहे,” असा हल्लाबोल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिल्लक सेना आहे. ती शिल्लक सेनाच आहे. खरी शिवसेना आपल्याकडं आहे. हे तीनही पक्ष एकत्रित आले, तरीही भाजपा-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील. कारण, अडीच वर्षाचा कारभार जनतेने पाहिला आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.अडीच वर्षे मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नाहीत. हे मी म्हणत नाही. शरद पवार यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. ‘अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोनच वेळा मंत्रालयात गेले. यामुळे आमचं मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी आहे,’ असेही शरद पवारांनी पुस्तकात सांगितलं,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

शरद पवारांनी ज्यांच्याबद्दल दोन-तीन पाने लिहून ठेवली आहेत. त्यांच्या नेतृत्वात हे वज्रमूठ सभा घेत आहेत. वज्रमूठ सभेत हे भाषण देत आहेत. भाषण झाल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले म्हणतात यांच्याकडं दहा लोकही नाहीत. आपण लोक आणायची आणि हात दाखवत भाषण करायची. त्यापेक्षा वज्रमूठ बंद करा. म्हणून वज्रमूठ सभा देखील आता बंद झालेल्या आहेत. वज्रमूठीला इतके तडे गेले आहेत की वज्राचं काम करू शकत नाही,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

हे ही वाचा:

शिबिराच्या माध्यमातून उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

शिवसेना ठाकरे गटाला अजून एक मोठा धक्का

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version