महाराष्ट्रामध्ये कोणीही कायदा हातात घेणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान

महाराष्ट्रामध्ये कोणीही कायदा हातात घेणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक (Maharashtra – Karnataka) सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी (Hirebagwadi) टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedika) कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत फडणववीसांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जातं. जे कुणी वाहनं रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर ही सुरुवात झाली आहे. सीमाभागातील नागरिक आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर कर्नाटककडून त्याची रिअॅक्शन येऊ लागली. प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कायदा हातात घेणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार (Sharad Pawar) यांना ४८ तासात कर्नाटकमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रातील लोकांनाही माझी विनंती आहे की क्रियेला प्रतिक्रिया दिली तर हे प्रकार वाढत जातील. त्यामुळं तसं करु नये, असं फडणवीस म्हणाले. कर्नाटकच्या सरकारची जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या लोकांवर अन्याय करु नये, असं फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

Border Dispute कर्नाटक राज्याच्या दादागिरीविरोधात पवई येथील कर्नाटक बॅंकेच्या बाहेर राष्ट्रवादीकडून आंदोलन

मलायका अरोराचा ड्रेस पाहून नेटकऱ्यानी केले ट्रॉल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version