spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर Devendra Fadnavis म्हणाले, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे…

विधीमंडळ अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड ही घडली आणि त्यामुळे राज्यातील वातावरण हे पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. विधीमंडळ अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत आणि तेच राहणार आहेत, असा स्पष्ट निर्वाळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार नाही, याची त्यांना पूर्वकल्पना असल्याचाही गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहणार आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात लढवणार आहोत. “कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, मी अतिशय स्पष्टपणे सांगतो १० तारीख ११ तारीख आणि ९ तारीखला काही होणार नाही. काही झालं तर विस्तार होईल. त्याची तारीख मुख्यमंत्री करतील असेही फडणवीस यांनी म्हटले. माझं वक्तव्य कान उघडणीसाठी पुरे आहे असे म्हणत मुख्यमंत्रीपदावरून वक्तव्य करणाऱ्या आमदारांना त्यांनी सुनावले. मुख्यमंत्रीबदलावरून विरोधक पतंगबाजी करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

नितीन गडकरी धमकी प्रकरणाला वेगळे वळण

अजित पवारांनी केली विधानपरिषदेत मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss