Devendra Fadnavis : गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी; फडणवीसांची बाप्पाच्या चरणी प्रार्थना

Devendra Fadnavis : गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी; फडणवीसांची बाप्पाच्या चरणी प्रार्थना

Devendra Fadnavis : आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यभरातील गणपतींचे विसर्जन (Ganesh Visarjan) केले जाणार आहे. आज सकाळ पासूनच नागरिक मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश विसर्जनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरातील गणपतींचे आज विसर्जन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरील गणपतीचेही मंगळवारी विसर्जन करण्यात आले. सागर बंगल्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपतीच्या दर्शनाला अनेक राजकीय नेते आले होते. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) हे फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येऊन गेले. याशिवाय, मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते अमीन पटेल (Amin Patel )यांनी गणपती दर्शनाच्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ही चर्चेचा मोठा विषय बनली. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठकही फडणवीसांच्या बंगल्यावर पार पडली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर म्हणाले की, ”गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत. तसेच गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी.”

राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाले होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी होत आहे. पितृपक्ष संपल्यानंतर महायुतीकडून उमेदवारांची नावे असलेल्या याद्या प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मतदान आणि मतमोजणी पार पडेल.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version