Aditya Thackeray : ‘महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे’ ; फडणवीसांच्या आरोपाला ठाकरेंचे प्रत्युत्तर

Aditya Thackeray : ‘महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे’ ; फडणवीसांच्या आरोपाला ठाकरेंचे प्रत्युत्तर

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात येणार तीन ते चार मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. या आरोपानंतर आजा राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. गुजरातला गेलेला वेदांचा-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मविआ सरकारला फडणवीसांनी दोष दिला आहे. पण त्यांचे हे दावे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेल्या प्रोजेक्टचं क्रेडिट फडणवीसांनी घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आज फडणवीस खोटं बोलले असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

हेही वाचा : 

‘एकनाथ शिंदे अडचणीत आलेत’ ; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचे वक्तव्य

आदित्य ठाकरे म्हणले, “जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे, असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी: आदित्य ठाकरे

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पबाबतची टाइमलाईन ही त्यांनी सांगितली आहे. ते म्हणाले आहेत की, १५ डिसेंबर २०२१ केंद्र सरकारने ७६ हजार कोटीची सबसिडी जाहीर केली. ज्यात त्यांनी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. ५ जानेवारी २०२२ रोजी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांताने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणाला दिले. ११ जानेवारी २०२२ महाराष्ट्र सरकारने यावर प्रतिसाद दिला. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टला अप्रूवल दिलं. यानंतर १६ जानेवारीला वेदांताने परत राज्य सरकारला लिहिलं आणि याबाबत थोडी स्पष्टता मागितली.

विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलची कारवाई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोप

फॉक्सकॉनबाबत या संदर्भात बोलताना तत्कालिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही असं स्टेटमेंट दिल होतं याचा फोटोच फडणवीसांनी दाखवला. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्री सुभाष देसाईंना माहिती होतं फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाहीये, तर मग तो गेला तेव्हा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अशी भूमिका का घेतली की या सरकारच्या काळात गेला? तुम्हाला तर माहिती होतं. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे.

Virat Kohli : विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनुष्का शर्मा भडकली, म्हणाली ‘हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे’

Exit mobile version