अंधेरीत माघारीनंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने या निवडणुकीसंदर्भातील चर्चा दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंधेरीत माघारीनंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने या निवडणुकीसंदर्भातील चर्चा दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ते आज दुपारी एक वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील माघारीनंतर फडणवीस याचा हा दौरा होत असल्यानं या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या या दौऱ्यामध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. या माघारीनंतर फडणवीस यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय वतृळाचं लक्ष लागलं आहे. फडणवीस आज दुपारी एक वाजता दिल्लीमध्ये दाखल होतील. आपल्या या दिल्ली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमध्ये येत्या १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. हिमाचल प्रदेश या राज्यामधील बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. त्यामुळे हवामानाचा मुद्दा लक्षात घेता येथील निवडणूक कार्यक्रम अगोदर घोषित करण्यात आला आहे. याच घोषणेच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाने निवडणुकीची तयारी सुरु केली असून त्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज सायंकाळी दिल्लीत पार पडणार आहे. हिमाचलमधील रणनिती आणि तिकीट वाटप यासंदर्भातील चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. महाराष्ट्रामधून केवळ देवेंद्र फडणवीस हे या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. त्यामुळेच फडणवीस आज दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. सायंकाळी ही बैठक पार पडणार असली तर या दौऱ्यामध्ये फडणवीस इतर केंद्रीय नेत्यांना भेटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली. भाजप अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता भाजपाच्या माघारीमुळे लटके यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

हे ही वाचा:

‘महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय, पुढे-पुढे पाहा…’ – सामना

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; तातडीने मुंबईला रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version