देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर दाखल, राज ठाकरेंना भेटण्यामागचे कारण काय?

राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर दाखल, राज ठाकरेंना भेटण्यामागचे कारण काय?

मुंबई : राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध कायमच चांगले राहिले आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्या दुरावानंतर भाजप आणि राज ठाकरेंची जवळ झाली. त्यात राज ठाकरे हे नेहमी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असतात. आणि यावरून भाजप आणि मनसे यांच्यात हिंदुत्वावर एकमत झाले.

उपमुख्यमंत्री यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे भगवी शाल देऊन सत्कार केला. व राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीसांचे औक्षण केले. त्याचबरोबर ठाकरे आणि फडणवीसांचे राजकीय समीकरणावर तब्बल दीड तास चर्चा झाली.

हेही वाचा : 

हे सरकार हिंदुत्व द्रोही आणि बेकायदेशीर – संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते. या पत्राला उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानतील असे भर विधानसभेत सांगण्यात आले होते.

फडणवीसांच्या विधानानंतर राज्यातील मंत्रिमंडळात मनसेचाही समावेश असेल अशी चर्चा सुरू झाली मनसेचा एकमेव आमदार विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत बहुमत चाचणी आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला साथ देणार आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप आता एकत्र येणार असल्याचं बोलले जाते. त्यातच अलीकडे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना यांना मंत्रीपद देणार असल्याची चर्चा सुरू होती परंतु ही अफवा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेचे उलटे परिणाम दिसतायत – गजानन काळे

Exit mobile version