देवेंद्र फडणवीस आमचे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

शिर्डी - नवीन सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाचा गजर सुरू झाला आहे. आम्ही किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय.

देवेंद्र फडणवीस आमचे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

शिर्डी – नवीन सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाचा गजर सुरू झाला आहे. आम्ही किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. जेव्हा पासून नवीन सरकार स्थापन झाले आहे तेव्हा पासूनच सरकारकडून हिंदुत्वाचा गजर करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नावावर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. शिर्डी येथे आंदोलनात बोलताना नितीश राणे (nitish rane) यांनी पुन्हा एकदा म्हविकास आघाडी वर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी बोलताना नितीश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि हिंदूह्रद्यसम्राट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असा उल्लेख करण्यात आला.

आज बोलताना नितीश राणे यांनी म्हटले आहे कि हे सरकार हिंदवी सरकार आहे आणि एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी आहेत. आतापर्यंत बाळासाहेब ठकरे यांच्या नवा पुढे हिंदुहृदयसम्राट लावलं जायचं पण आज शिर्डीमध्ये आंदोलनात बोलतांना नितीश राणे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. आंदोलनात बोलताना नितीश राणे यांनी अधिकार्यांना खडसावले. जर कुठल्या हिंदू मुलावर अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, हे सरकार हिंदुत्ववादी आहे. हे सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा. जर कोणी हिंदू मुलांकडे वाकड्या नजरेनी बघितले तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाही. आम्ही शांतपणे मोर्चा काढतोय. जर कोणी अंगावर आल तर त्याला आम्ही शिंगावर घेऊ असा हल्लाबोल भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. आमच्या माता भगिनींकडे कोणी वाकड्या नजरेनी बघितले तर त्याला जशास तसं उत्तर दिले जाईल. तसेच पुढे नितेश राणे म्हणले कि, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मावळे आहोत आम्हाला हातात शःत्र घेण्यास भाग पाडू नका.

दरम्यान हिंदुहृदयसम्राट म्हणून दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. मात्र आता शिंदे यांनी अर्ध्यापेक्षा अधिक आमदार सोबत घेऊन वेगळी शिवसेना उभी केली आहे. तसेच त्यांनी भाजपसोबत जावून सरकार स्थापन केले. मात्र आता मित्र पक्षाच्या नेत्यानेच देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदयसम्राट म्हटलं आहे. हे शिंदे गटाला कितपत रुचणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अद्याप शिवसेनेकडून यावर कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा:

ब्रम्हासत्रमधील दीपिकाचा कॅमिओमुळे ब्रम्हासत्र भाग २: देव साठी चाहत्यांची उत्सुकता पोहोचली शिगेला

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू केली, वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ब्रह्मास्त्राची कमाई हि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक सुखद धक्काच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version