Wednesday, September 25, 2024

Latest Posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे केले कौतुक

बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. महाराष्ट्राच्या रयतेचं राज्य आल्याने मला अभिमान वाटतोय असं ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पनवेल – पनवेल येथे आज भाजपाची कार्यकारणी बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल मधील माजी खासदार दी.बा पाटील यांच्या संग्राम बंगल्यावर त्यांच्या कुटुंबीयांची भेट देखील घेतली. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. महाराष्ट्राच्या रयतेचं राज्य आल्याने मला अभिमान वाटतोय असं ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत-पिकांचे नुकसान

 

फडणवीस म्हणाले, “राज्यातील सत्तेचा गड आपण जरी जिंकलो असलो तरी मोदींनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे त्या यात्रेतील गड जिंकल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. हे सरकार यावं ही तर श्रींची इच्छा… हे सरकार यावं ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती असं देवेंद्र फडणवीस उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना म्हणाले.” राज्यात पहिल्यांदाच सत्तेतील ४० आमदार सत्ता सोडून विरोधी पक्षात आले आहेत. कारण त्यांना माहिती होतं की आपण येथे राहिलो तर संपणार आहोत.

हेही वाचा

मामाने भाचीची शुल्लक कारणावरून केली हत्या; आंबा मागितल्याने आला राग

“शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता आमच्यासोबत जे आले तीच खरी शिवसेना आहे. गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीने सूडाचं राजकारण केलं आहे. हे वर्ष खूप संघर्षाचे गेले आणि या अडीत वर्षात महाराष्ट्र खूप मागे गेला, प्रगतीची सर्व कामे थांबवली गेली, केंद्राने कोट्यावधी रूपये दिले ते काम मागच्या सरकारने बंद केले पण सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही… त्यामुळे राज्यात जे सत्तांतर झाले आहे ते सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे.” असं उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss