spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांना आलेल्या धमकीवर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरवरून धमकी आली आणि त्यानंतर पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना आणि त्यांच्या भावाला देखील फोनवरून धमकी आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरवरून धमकी आली आणि त्यानंतर पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना आणि त्यांच्या भावाला देखील फोनवरून धमकी आहे. शरद पवारांना ज्या ट्विटर हॅण्डलवरून धमकी आली आहे त्यांची शहानिशा करुन कारवाई करा असे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांना दिला आहे. शरद पवारांना धमकी आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी लगेचच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवारांना आलेल्या धमकी प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जवळपास पाऊण तासाची ही भेट होती. शरद पवारांना आलेल्या धमाच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उच्च परंपरा आहे ते म्हणजेच जर राजकीय पातळीवर मतभेद असले तरी ते मनभेद नाहीत कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना सकाळी ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शरद पवारांच्या पुण्यामधील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली. शरद पवारांना धमकी आलेल्या ट्विटर हॅंडलचे नाव ‘राजकारण महाराष्ट्राचे’ असे आहे.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss