spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांच्या राजकीय भाकरीवर देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मोठे पाऊल उचलत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मोठे पाऊल उचलत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले. काँग्रेस पक्षाच्या २५ व्या स्थापना दिनाच्या समारंभात दिल्लीत पवारांसहित अनेकांना बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर शरद पवार यांनि यावेळेस देखील संधीचा फायदा घेत मोठी घोषणा केली. शरद पवार यांनी काही महिन्याभरापूर्वी अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली होती. मात्र आता पुन्हा शरद पवार यांच्या कडून पुन्हा मोठी घोषणा केली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मोठे पाऊल उचलत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले. पवारांच्या या घोषणेने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फक्त सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच कार्याध्यक्ष का करण्यात आले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र शरद पवार यांनी भाकरी फिरवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांच्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. पवारांनी केलेल्या घोषणेमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलेले दिसले. राजकारणातून बड्या नेत्याकडून याविषयी चर्चा झाल्या. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे मत व्यक्ते केले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद सोपवल्यानंतर आता महाराष्ट्रातील निवडणूकांची जबाबदारी ही सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल. तसेच देशभरातील आगामी निवडणुकीची जबाबदारी हे नवे कार्याध्यक्ष सांभाळणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर वाटून देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे या महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि गोवा या राज्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी भाकरी फिरवण्यावर प्रश्न विचारण्यात आला. तर देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. याला भाकरी फिरवणे म्हणत नाहीत ही तर धूळफेक आहे, असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे ते बघून घेतली. शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत विषय आहे तेव्हा अचानक निर्णय कसा काय देण्यात आला. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला असेल असे मत व्यक्त केले.

हे ही वाचा:

कझाकस्तानच्या जंगलामध्ये अग्नीतांडव, १४ जणांचे मृतदेह सापडले

संजय राऊतांनी Amit Shah यांना खडेबोल सुनावले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss