‘मुंबई पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा दिसणार’ ,देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

‘मुंबई पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा दिसणार’ ,देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर मावळते सरकार आणि सत्ताधारी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगू लागला. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली आयोजन करण्यात आले. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली. त्यासोबत आशिष शेलार यांना मुंबई महापालिकेचा २०-२० सामना जिंकायचा असल्याचं म्हणत भाजपासाठी मुंबई महापालिका निवडणूक महत्वाची असल्याचे स्पष्टीकरण दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत केली. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडून काम करत नसल्याची टीका भाजपाकडून केली जात होती. त्याचा संदर्भ घेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहिहंडी जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे ; अजित पवार

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकी विषयी बोलता म्हणाले, “येत्या काळात मुंबई महानगर पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा असेल. आपली पूर्ण तयारी झाली आहे. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पाऊल मागे आलो. पण आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजपा युतीचाच महापौर बसेल. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा मिळून या निवडणुकीत आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : 

मुंबईला धमकीचा मॅसेज आल्याप्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे स्पष्टीकरण

Exit mobile version