spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MNS महायुतीला साथ देईल ही अपेक्षा… गुढीपाडवा मेळाव्याआधी Devendra Fadnavis यांचे मोठे विधान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अश्यातच उद्या (मंगळवार, ९ एप्रिल) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा (MNS Gudhipadwa Rally) पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वीच याचा टीजरही मनसेतर्फे रिलीज करण्यात आला होता. आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे व्यक्तव्य करत , ‘राज ठाकरे हे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना पाठिंबा देतील,’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत सांगितले, “मोदीजींच्या सभेने भाजपच्या विजयाची अनुकूलता मोठ्या विजयामध्ये परिवर्तित होईल, यामध्ये शंकाच नाही. पंतप्राधनांच्या दोन साभांमुळे विदर्भ धावळून निघेल. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने त्यांचाशी जवळीक वाढली आहे. ते पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील, हि अपेक्षा आहे.” “मनसेसोबत गेल्या काही काळात चारचा झाली आहे. मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यापासून त्यांचाशी जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी २०१४ साली मोदीजींना समर्थन दिले होते.”

पुढे ते म्हणाले, “राज ठाकरे यांना देखील मान्य असेल कि, पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात जो विकास केला आहे. नवीन भारताची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांचासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे. अशा विचाराने प्रेरित सर्व लोकांनी मोदींसोबत राहायला हवं. मला विश्वास आहे कि राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. “

मनसे होणार महायुतीत सामील?

मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. त्यात, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चांना सुरुवात झाली होती. मनसे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आत राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्याआधीच, फडणवीस यांच्या व्यक्तव्याने राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रपणे लढवून विजयी होण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

Solapur मध्ये होणार ‘चौरंगी’ लढत! आता MIM देखील निवडणुकीच्या रिंगणात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss