Waqf Board च्या जमिनी Congress ने लाटल्या, Devendra Fadnavis यांचे गंभीर आरोप

Waqf Board च्या जमिनी Congress ने लाटल्या, Devendra Fadnavis यांचे गंभीर आरोप

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) लोकसभेत वक्फ बोर्डाविषयी (Waqf Board) कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक (Waqf Board Ammendment Bill)  सादर केले. हे विधेयक सादर केल्यानंतर संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. हे विधेयक म्हणजे संविधान, संघराज्य आणि अल्पसंख्यांकांवर हल्ला असल्याचे म्हंटले आहे. विरोधकांकडून कडाक्याचा विरोध होत असताना किरेन रिजिजू यांनी हे विधेयक कोणत्याही धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करत नाही. यातून घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नसल्याचे म्हंटले आहे. आता, विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर (Congress) चांगलीच आगपाखड केली आहे. फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत, “वक्फच्या बिलाशी कॉंग्रेसला त्याच्याशी काही देणंघेणं नाही आहे, त्यांना फक्त वक्फच्या जमिनीशी घेणेदेणे आहे,” अश्या शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत या विषयावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “वक्फच्या बिलाशी कॉंग्रेसला त्याच्याशी काही देणंघेणं नाही आहे, त्यांना फक्त वक्फच्या जमिनीशी घेणेदेणे आहे. महाराष्ट्रात जेव्हा यांची सरकार होती तेव्हा त्यांनी खूप मोठा वक्फचा घोटाळा केला होता. याचा रिपोर्टदेखील समोर आला आहे. कि काश्यरकारे काँग्रेस नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या. आणि वक्फच्या नावाने सगळ्या जमिनी आपल्या संस्थांकडे घेतल्या. वक्फ बोर्डाच्या जमिनी कॉंग्रेसने लाटल्या आहेत.तर यांना पारदर्शकता नको हवी आहे. पारदर्शकता आणणारे हे बिल होते. यांची अशी ईच्छा आहे कि अश्याचप्रकारे वक्फ बोर्डाचा कारभार चालत राहावा. कारण, वक्फला समोर ठेवून गैरकारभार चालत राहावा, ” असे त्यांनी म्हंटले आहे.

केंद्र सरकारने वक्फ बोर्डाचे विधेयक संसदेत मांडले. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजीजु यांनी गुरुवारी संसदेत हे विधेयक सादर केले. हे विधेयक सदर करताच विरोधकांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवत विरोध केला. काँग्रेससह नऊ पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. त्यामुळे संसदेच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्यात आले. आता या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारणदेखील रंगत असून सर्वच पक्षातील राजकीय नेते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हे ही वाचा :

Vidhansabha Election 2024 : ‘या’ ७ विभागात होणार जाहीर सभा; मुख्यमंत्र्यांसह ३ नेत्यांनी घेतला मध्यरात्री निर्णय

Modi Government चा डोळा Waqf Board च्या जमिनींवर, Jitendra Awhad यांची जोरदार टीका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version