नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलेले आहे… Devendra Fadnavis यांची विरोधकांवर टीका

नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलेले आहे… Devendra Fadnavis यांची विरोधकांवर टीका

मालवण येथील राजकोट (Rajkot) या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज १ सप्टेंबर रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आला आहे. या मोर्चाबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले असून त्यांनी विरोधकांवर आरोपांची तोफ डागली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीच्या आंदोलनाबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेले आहे. त्या संदर्भात कॉंग्रेसला माफी मागायला लावणार का? कॉंग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशात महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मूक होऊन बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे तेथील प्रदेशाध्यक्षांनी महाराजांचा पुतळा हटवला,त्याबद्धल ते एक शब्दही का बोलत नाही. पहिले याचे उत्तर दिले पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

जोडे मारो आंदोलनात कोणाचा सहभाग?

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

महायुती (Mahayuti) कडूनही आंदोलनाची हाक

आज हुतात्मा चौक (Hutatma Chowk) ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र तरीही मविआकडून हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय मविआच्या आंदोलनाला महायुतीने आंदोलनातूनच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा:

Exit mobile version