spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा… ‘, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

सध्या परिस्थितीत काही घटक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी या गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष असेल असं फडणवीस यावेळी म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं केली पाहिजेत.

सध्या परिस्थितीत काही घटक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी या गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष असेल असं फडणवीस यावेळी म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं केली पाहिजेत. भाषण करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) पार्श्वभूमीवर दिला आहे.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल. दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. दोन्हीकडील कार्यकर्ते देखील कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करतील असे फडणवीसांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, कायद्याच्या पलीकडं जाणून कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेन. राजकारणात एकमेकांवर टीका टिपण्णी होत असते. पण हे कायद्याच्या चौकटीत राहून करावं असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कोणता दसरा मेळावा अटेन्ट करण्यास इच्छूक आहात असा प्रश्न विचारण्यात आला, यावेळी ते म्हणाले की, मी नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

पुढे नाना पाटोळे यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चित्ते भारतात कोठून आणले आहेत, याबद्दलची माहिती नाही. त्यांनी दुसऱ्याच ठिकाणचे नाव सांगितले आहे. पहिलं त्यांनी माहिती घ्यावी की कोठून चित्ते आणले आहेत. नाना पटोले चुकीची वक्तव्य करत असतात, असेही फडणवीस म्हणाले. नाना पटोले हे चर्चेत राहण्यासाठी अशी विविध प्रकारची वक्तव्य करत आहेत. काहीतरी उलट सुलट बोललं की दिवसभर चालते. मग त्याच्यावर कोणीतरी प्रतिक्रिया देते. त्यामुळं नाना पटोलेंच्या वक्तव्याला मी महत्व देत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज, या पोलिसांची नियुक्ती करण्यात आली

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या बैठकीत वाद, वरून सरदेसाई यांना ……

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss