spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी या होत आहेत. त्यातच आता राज्यात पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण झाले आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी या होत आहेत. त्यातच आता राज्यात पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण झाले आहे. अजून पर्यंत राज्यात पुरेसा पाऊस हा झाला नाही त्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची (Farmers) पिकं वाया जात आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. परंतु शेतकऱ्यांकडे सध्या दुसरा उपाय म्हणून विहीरीचे पाणी आहे. परंतु ते पाणी जर शेतात सोडायचे असेल तर त्या साठी देखील सुरळीत वीजपुरवठा हा लागतोच. या सर्व प्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेतली आहे.

राज्यात अद्याप पुरेसा पाऊस हा झाला नाही आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. पाऊस नाही त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही आहे. तसेच ज्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पाण्याचा साठा आहे ते शेतकरी पिकांना जागवण्याचा पर्यंत करत आहेत परंतु वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दखल घेतली आहे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन, अशा इशारा देवेंद्र फडणवीसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

लातूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिकं हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबरच महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही. या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांना सांगितली. औसा येथील महावितरणच्या बैठकीत शेतकऱ्यांनी याबाबत सांगितले. त्यानंतर अभिमन्यू पवार यांनी बैठकीतूनच थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण अधिकार्‍यांना खडे बोल सुनाववे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन असा सज्जड इशारा फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा:

Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…

बच्चू कडू यांनी केली Sachin Tendulkar कडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss