spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा फुले (Mahatma Phule) आणि कर्मवीर भाऊराव (Karmaveer Bhaurao Patil) पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येच (Pimpri-Chinchwad) त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. एखादा शब्द पकडून त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. माफीनंतर टार्गेट करणं चुकीचं आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. फडणवीस यांनी मुंबईत (Mumbai) माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

“खरं म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणं योग्य नाही. अर्थात मी माध्यमांना दोष देत नाहीय”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. “जी लोकं अशाप्रकारचं कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे. जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

तमिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा, ४ जणांचा मृत्यू

शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांनी दिली पहिली पतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss