देवेंद्र फडणवीसांची ‘मिशन मुंबई’ ला सुरुवात म्हणाले, BMC ची ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून लढा

अभी नही तो कभी नही असे ठरवा.

देवेंद्र फडणवीसांची ‘मिशन मुंबई’ ला सुरुवात म्हणाले, BMC ची ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून लढा

मुंबई महापालिका निवडणुकातील भाजपा (BJP)आणि एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde group)यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah)यांनी केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून आणि लढा आवेशपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah Mumbai Tour) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या 200 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah Mumbai Tour) हे मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या 200 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या सभेदरम्यान बोलत असताना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संपूर्ण देशाला चाणक्य कोण आहेत हे माहीत आहे आणि चाणक्य म्हणजे अमित शाह आहेत”. तसेच य सभेच्यावेळी पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,” मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा.” तसेच या सभेच्या वेळी आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना “वॉर्ड रचना काय होईल, कसा प्रभाग असेल याचा विचार करून चालणार नाही, काम करत रहावे” असे आवाहन केले आहे.

या सभेच्या वेळी आशिष शेलारांनी देखील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. “मागील निवडणुकीत 50 ते 100 मतांनी 13 वॉर्डमध्ये पराभव झाला. आता 135 जागांवर विजय मिळवायचा” असं आशिष शेलार म्हणाले . “तसेच मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली त्यातून तिला बाहेर काढायचं” असं म्हणतं आशिष शेलारांनी ठाकरे परिवारावर टीकादेखील केली. आपण सर्व एका नव्या इतिहासाचे साक्षीदार होणार असून 2017 ला राहिलेलं स्वप्न 2022 ला पूर्ण करायचे आहे असे शेलार यांनी म्हटले.

हे ही वाचा:

अमित शहा यांचा आज मुंबई दौरा, सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक ; जाणून घ्या सर्व घडामोडी

गृहमंत्री अमित शाहांनी घेतले वांद्र्यातील सार्वजनिक मंडळातील बाप्पाचे दर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version