देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड दिलखुलास गप्पा, काय काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड दिलखुलास गप्पा, काय काय म्हणाले फडणवीस?

दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पत्रकारांसोबत अनौपचारीक गप्पा मारल्या. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासोबत सध्याच्या राजकीय वातावरणावरही आपलं मत व्यक्त केलं. तेव्हा त्यांनी आवडता बंगला, शिंदेंची झोप, गृहखातं, राग-सहनशीलता अन् राशीभविष्य अशा विविध विषयांवर भाष्य करत आपण दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा नाहीच; आता दिवाळीनंतरच पंचनामे होणार?

आवडता बंगला

देवेंद्र फडणवीसांचा आवडता बंगला कुठला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फडणवीसांनी त्याचं उत्तर दिलं आहे. मला सागर बंगला आवडतो. इथं मी खूश आहे. हा बंगला खूप पॉझिटिव्हीट आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं.

गृहखातं

गृहखात्याबाबतही फडणवीस बोलते झाले. राज्यमंत्री लवकर केले नाहीत तर त्रास हा होतोच. डोक्यावरचे केस गेले तरच समजायचं की गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलंय, असं फडणवीस म्हणालेत.

हेही वाचा : 

व्हाट्सअँप चे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का ? नाही तर जाल तुरुंगात !

राग-सहनशीलता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमका राग केव्हा येतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मला तेव्हाच राग येतो, जेव्हा मला खूप भूक लागलेली असते. अगदी खेळीमेळीच्या वातावरण पत्रकारांसोबत फडणवीस यांना चर्चा केली. पत्रकारांच्या काही ऑफ दी रेकॉर्ड प्रश्नांवरही फडणवीस यांनी आपलं मत यावेळी व्यक्त केलं.

शिंदेंची झोप

‘मुख्यमंत्री शिंदे केव्हा झोपतात, हा खरंतर संशोधनाचा विषय’, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झोपेवर फडणवीसांनी भाष्य केलंय.

राशीभविष्य

तुम्ही कुठला दिवाळी अंक वाचता असं विचारल्यावर, ज्या दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलेलं असतं, तोच दिवाळी अंक मी वाचतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

“घर, बंदूक, बिरयाणी” चित्रपटाच्या निमित्ताने, नागराज मंजुळे आणि आकाश थोसर सैराटनंतर पुन्हा एकत्र

शासनाने समन्वय समिती स्थापन केली आहे

परिसराच्या विकासासाठी वैधानिक विकास मंडळांचे पुनरुज्जीवन करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. महामंडळांची पुनर्रचनाही लवकरच होणार आहे. महामंडळांच्या नियुक्त्यांसंदर्भात शासनाने समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीत चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दादा भुसे आदी नेते, मंत्र्यांचा समावेश आहे. नागपूर विमानतळ विकासाचा प्रश्न जवळपास मिटला आहे. नोव्हेंबरमध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे.

Exit mobile version