‘शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’, देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

‘शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’, देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना आमदारांसाहित ते बाहेर पडले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपा सोबत युती करत महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर बिहारमधील राजकीय वर्तुळात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचं संयुक्त सरकार नवे सरकार स्थापन केले. ज्याचा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. परंतु याचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळत आहेत. भाजप हा राजकीय पक्ष मित्र पक्षांना संपवतो आहे. असे व्यक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

भाजप त्यांच्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांचे विधान

पवार यांनी म्हटले, “भाजपा मित्रपक्षांना संपवत आहे, उदाहरण द्यायचं झाल्यास, पंजाबमध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते. मात्र, अकाली दल हा पक्ष आज जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप अनेकवर्षे एकत्र होते. आज भाजपने शिवसेनेची अवस्था काय केली आहे? भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

Nitish kumar : बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकार स्थापन, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली

Exit mobile version